मोदी सरकारवर हल्लाबोल, पीएम केअर्स फंड मधील पैसा कुठे?

mamata-4_647_012816082535_110716050905

नवी दिल्ली – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “देशातील संघराज्याचा ढाचा उद्ध्वस्त करण्यासाठी केंद्रातील सरकारने विविध सरकारी यंत्रणांचा उपयोग केला” असा आरोप ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी केला आहे. यासोबतच कोरोनाच्या काळात नागरिकांकडून गोळा केलेला ‘पीएम केअर्स फंड’मधील पैसा कुठे गेला असा सवालही त्यांनी केला आहे. तसेच केंद्रातील सरकारच्या इशाऱ्यावर राज्य सरकार चालणार नाही असं ही म्हटलं आहे.

“पीएम केअर्स फंडातील सर्व पैसे कुठे गेले? या मदतीचे भवितव्य काय आहे ते कोणाला माहिती आहे की नाही? कोट्यवधी रुपयांचा पैसा कुठे गेला, त्याचा हिशेब सादर का गेला नाही, केंद्र सरकार राज्य सरकारला सल्ले देतं मात्र कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने काय केलं याबाबत कोणीही बोलत नाही” असंही ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. कॅबिनेट बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत त्यांनी असं म्हटलं आहे.

Latest News