वादग्रस्त माजी न्यायाधीश सीएस कर्णन यांच्यावर पुन्हा एकदा अटकेची कारवाई

ares

चेन्नई – वादग्रस्त माजी न्यायाधीश सीएस कर्णन यांच्यावर पुन्हा एकदा अटकेची कारवाई करण्यात आली आहे. न्यायाधीशांच्या पत्नी आणि महिला न्यायाधीशांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याच्या कथित आरोपाखाली कर्णन यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, काही वर्षांपूर्वी न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कर्णन यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर सुमारे सहा महिने ते तुरुंगात होते.

माजी न्यायाधीश असलेले सीएस कर्णन यांनी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीशांविरोधात कथितपणे अपमानकारक आणि मानहानीकारक टिप्पणी केली होती. तसेच ती ऑनलाइन पोस्ट केली होती. या आरोपाखाली न्यायाधीश कर्णन यांना बुधवारी चेन्नई पोलिसांनी अटक केली.

दरम्यान, न्यायमूर्ती सीएस कर्णन यांचा कार्यकाळ वादग्रस्त राहिला होता. काही वर्षांपूर्वी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या तत्कालीन सरन्यायाधीशांसह इतर न्यायाधीशांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर कर्णन यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर पुढे सहा महिने ते तुरुंगात होते.

Latest News