राष्ट्रवादीचे नेतृत्त्व कुणाकडे जाणार?


मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्त्व कुणाकडे जाणार?, असा प्रश्न सातत्याने विचारला जातो. लोकमत वृत्तसमुहाला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी यावर भाष्य केलं आहे.
शरद पवार यांनी तीन नावं घेतली आहे. यामध्ये अजित पवार, जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांच्या नावांचा समावेश आहे. तसेच यासारखे अनेकजण पक्षात आहेत जे राष्ट्रवादीचं नेतृत्त्व करु शकतात, असंही शरद पवार यांनी सांगितलं आहे. सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री बनणार का?, असा प्रश्नही त्यांना या मुलाखतीत विचारण्यात आला होता. यावर त्यांना राज्याच्या राजकारणापेक्षा देशाच्या राजकारणात जास्त रस असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्त्व कुणाकडे जाणार याविषयी महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने चर्चा रंगत असते, मात्र शरद पवार यांनी यामध्ये घेतलेल्या नावांमुळे ही चर्चा आणखी रंगण्याची शक्यता आहे.