शेतकरी आक्रमक: सहा महिन्यांचं रेशन सोबत, आता मागे हटणार नाही

karam-singh-2

नवी दिल्ली | केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी नवीन कृषीकायदा केला आहे. या कायद्यामुळे देशभरातील सर्व शेतकरी आक्रमक झाले असून गेल्या सहा दिवसांपासून ते दिल्लीमध्ये आंदोलन करत आहेत.

या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेल्या एका शेतकऱ्यांशी बातचीत केली असता, त्यावेळी ‘बेटा, छह महिने का राशन लेके आये हैं, हटेंगे नहीं, डटे रहेंगे’, असं उत्तर करम सिंह नावाच्या शेतकऱ्यानी दिलं. करम सिंह हे पंजाबमधील पटियालातून आले आहेत. सहा महिन्याच्या तयारीने आलोय हे सांगण्याऱ्या या शेतकऱ्याचे आप्रूप असण्याचे कारण म्हणजे करम सिंह यांनी सत्तरी गाठली आहे, तरीही हे बोलतं असताना त्यांच्या आवाजाला धार चढली होती.

दरम्यान, पंजाब-हरियाणामधील शेतकरी चांगलेच तापलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारने यावर लवकात लवकर काहीतरी तोडगा काढणं आवश्यक आहे.

Latest News