कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांना दिली परवानगी!


नवी दिल्ली | केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात हरियाणा, पंजाब, राजस्थान आणि इतर राज्यातील शेतकरी दिल्लीत गेले आहेत. मात्र त्यांना दिल्ली परवानगी दिली जात नव्हती. शुक्रवारी पोलीस आणि आंदोलन कर्त्यांमध्ये धुमश्चक्री झाल्याचं पाहायला मिळालं होतं.
दिल्लीतील जंतर-मंतर किंवा रामलीला मैदानात आंदोलन करण्याची मागणी शेतकरी आंदोलनकर्त्यांनी केली होती. आंदोलनामध्ये जवळपास 5 लाख आंदोलनकर्त्यांचा यामध्ये सहभाग असल्याचं सांगितलं होतं.
दरम्यान, दिल्लीमध्ये दाखल झाल्याशिवाय माघारी फिरणार नसल्याचा आक्रमक पवित्रा शेतकरी संघटनांनी घेतला होता. कोरोनाच्या मार्गदर्शन तत्वांचं पालन करून निरंकारी मैदानातही मास्कसह सोशल डिस्टन्सिंग करून आंदोलन करणार असल्याचं सांगितलं आहे.