भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 64 वा महापरिनिर्वाण दिन


मुंबई: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 64 वा महापरिनिर्वाण दिन आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महापौर किशोरी पेडणेकर,
धनंजय मुंडे, आदित्य ठाकरे, वर्षा गायकवाड यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं. तर आरपीआयचे नेते रामदास आठवले हे देखील चैत्यभूमीवर येत अभिवादन करणार आहेत. त्याशिवाय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सकाळी 11 वाजता अभिवादन करतील.
चैत्यभूमी परिसरात गर्दी होऊ नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त पाहायला मिळत आहे. दादरमध्ये ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवरील मानवंदना, अभिवादन आणि दर्शनाचे थेट प्रक्षेपण, विविध माध्यमातून ऑनलाईन दर्शन, स्मारकावर हेलिकॉप्टरद्वारे पृष्पवृष्टी यांसह विविध सुविधा यांचे नियोजन करण्यात आली आहे.