मंत्रिपद गेलं तरी चालेल पण ओबीसी आरक्षणाला कोण हात लावतो ते पाहू- विजय वडेट्टीवार

obc

जालना | मराठा आरक्षणावरूवन राज्यात वातावरण पेटलं आहे. मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. अशातच मंत्रिपद गेलं तरी चालेल पण ओबीसी आरक्षणाला कोण हात लावतो ते पाहू, असं मंत्री आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. जालनामध्ये ते पत्रकारांशी बोलत होते.

मराठा आरक्षणामुळे ओबीसी समजाला धक्का लागेल अशी भीती काही ओबीसी नेत्यांना वाटते. आम्ही मराठा समाजासाठी पुर्ण ताकदीने उभे राहू. मात्र आम्हाला ओबीसी समाजामधून आरक्षण द्या म्हणणे पूर्ण चुकीचं असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणाले.

जर असाच काही प्रयत्न झाला तर मंत्रिपद गेलं तरी चालेल पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नसल्याचं वडेट्टीवारांनी सांगितलं.

दरम्यान, वडेट्टीवारांच्या उपस्थितीमध्ये आयोजीत ओबीसी मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका करण्यात आली. तेव्हा कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. त्यानंतर वडेट्टीवारांनी मध्यस्थी करत माईक घेत सर्वांना शांत केलं आणि मार्गदर्शन केलं.

Latest News