जेष्ठ कलावंत रवी पटवर्धनकाळाच्या पडद्याआड

raviiiiiiiiiiiiii

मुंबई | मराठी रंगभूमीचे, चित्रपट सृष्टीचे जेष्ठ कलावंत रवी पटवर्धन यांचे रात्री निधन झाले हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे नाटकासह मराठी सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

रवी पटवर्धन यांचा जन्म o6 सप्टेंबर 1937 रोजी झाला. ते 83 वर्षांचे होते. रवी पटवर्धन यांनी दीडशेहून अधिक नाटकांत आणि २०० हून अधिक चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. भारदस्त व्यक्तिमत्त्वाला शोभतील अशा झुपकेदार मिशा आणि आवाजातील खास जरब यामुळे त्यांना गावचा पाटील, पोलीस आयुक्त, न्यायाधीश किंवा खलनायकी भूमिका साकारल्या आहेत.

आरण्यक हे नाटक त्यांनी पहिल्यांदा १९७४ मध्ये रत्नाकर मतकरींबरोबर केले आणि वयाच्या ८२ व्या वर्षीही ते ह्या नाटकात तीच धृतराष्ट्राची भूमिका करत आहेत.

दरम्यान, बालगंधर्व हे १९४४ साली झालेल्या नाट्यमहोत्सवाचे रवी पटवर्धन अध्यक्ष होते, तर आचार्य अत्रे हे स्वागताध्यक्ष होते. त्या नाट्यमहोत्सवातल्या बालनाट्यात अवघ्या साडेसहा वर्षांच्या वयाच्या रवी पटवर्धनांनी भूमिका केली होती.

Latest News