पुणे महापालिकेने प्रतिबंधित क्षेत्रांची यादी जाहीर

पुणे – महापालिकेने प्रतिबंधित क्षेत्रांची (कन्टेन्मेंट झोन) यादी जाहीर केली आहे. दरम्यान, यात शहरातील कंटेन्मेंट झोन कायम आहेत.

दिवाळीनंतर करोना बाधितांची संख्या वाढण्याची शक्‍यता होती. मात्र, सध्या नवीन बाधितांचा आकडा चाचण्यांच्या तुलनेत 8 ते 10 टक्केच आहे. तसेच जवळपास 70 टक्के बाधित जुन्याच कन्टेन्मेंट भागातील आहेत. त्यामुळे ही संख्या वाढवली नसल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

शहरात सध्या करोनाच्या नवीन बाधितांची संख्या सरासरी 300 ते 350 पर्यंत आहे. सध्या जाहीर कन्टेन्मेंट झोनमध्ये कसबा- विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील साततोटी पोलीस चौकी परिसर, बिबवेवाडी-गंगाधाम सोसायाटी, वर्धमानपुरा सोसायटी, शंकर महाराज सोसायटी परिसर, फुरसुंगी, भेकराईनगर नगर, ढमाळवाडी परिसर, हडपसर आणि ससाणेनगरचा काही भाग, मगर

Latest News