नव्या संसदेसाठी, स्पेशल विमानासाठी पैसा आहे, मात्र शेतकऱ्यांना देण्यासाठी नाही

priyanka-modi

नवी दिल्ली | दिल्लीतील केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आहे. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ काँग्रेसनेही मोदी सरकराविरोधात आवाज उठवला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

नव्या संसदेसाठी केंद्र सरकारकडे 20 हजार कोटी रुपये आहेत. पंतप्रधानांसाठी विशेष विमान खरेदी करण्यासाठी 16 हजार कोटी रुपये आहेत. मात्र उत्तर प्रदेशातील  ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यासाठी सरकारकडे 14 हजार कोटी रुपये नाहीत, असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे.

2017 पासून उत्तर प्रदेशात उसाचा भाव वाढला नाही. हे सरकार फक्त अब्जाधिशांपुरताच विचार करतं असल्याची खोचक टीका केंद्रावर प्रियंका गांधींनी केली आहे.

दरम्यान, अन्नदाता रस्ते-मैदानावर धरणं देत आहे आणि ‘खोटे’ टीव्हीवर भाषण. शेतकऱ्यांच्या मेहनतीचं ऋण आपल्यावर आहे. हे ऋण त्यांना न्याय आणि त्यांचे अधिकार देऊनच उतरवलं जाईल. त्यांच्यावर लाठीमार करुन, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून ते ऋण उतरलं जाणार नसल्याचं म्हणच काँग्रेस नेते राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

Latest News