मोदी सरकारच्या कृषी कायद्याविरोधात आंदोलनाचे पडसाद लंडनमध्येही


नवी दिल्ली | मोदी सरकारच्या कृषी कायद्याविरोधात पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि इतर राज्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आहे. गेल्या 11 दिवसांपासून हे आंदोलन चालू आहे. राजधानीत चालू असेलल्या या आंदोलनाचे पडसाद लंडनमध्येही उमताना दिसत आहेत.
लंडमधील भारतीय दूतावासासमोर रविवारी निदर्शने करण्यात आली. आंदोलकांनी फलक झळकवत मोदी सरकारविरूद्ध घोषणाबाजी केली. या आंदोलनामुळे तिथे मोठ्या प्रमाणाच वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली. आंदोलनातील 13 आंदोलनकर्त्यांना पोलिसांना ताब्यात घेतलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित आंदोलनकर्त्यांना अटक केली आहे.
दरम्यान, दिल्लीच्या सीमेवर गेल्या अकरा दिवसापासून शेतकऱ्यांनी आंदोलन चालू ठेवलं आहे. केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी शेतकरी संघटनेची आहे. याबाबत 9 डिसेंबरला शेतकरी संघटना आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये बैठक होणार आहे. याआधीही त्यांच्यामध्ये बैठक झाली होती. मात्र त्या बैठकीमध्ये काहीच तोडगा निघाल नाही.