देशातील जनतेनंही स्वयंस्फुर्तीने शेतकऱ्यांच्या भारत बंदमध्ये सहभागी व्हावं

shet-97

मुंबई | शेतकऱ्यांच्या भारत बंदला शिवसेनेनेही पाठिंबा दिला आहे. खासदार संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शिवसेना शेतकऱ्यांच्या भारत बंदमध्ये सहभागी होणार असल्याचं म्हटलं आहे. देशातील जनतेनंही स्वयंस्फुर्तीने शेतकऱ्यांच्या भारत बंदमध्ये सहभागी व्हावं, असं आवाहन संजय राऊत यांनी केलं आहे.

देशातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या राष्ट्रव्यापी बंदला शिवसेनेचं समर्थन आहे. शेतकरी आपला अन्नदाता असल्याने त्यांच्याप्रती आपली नैतिक जबाबदारी आहे, त्यामुळेच देशातील जनतेनं स्वयंस्फूर्तीनं शेतकऱ्यांच्या बंदमध्ये सहभागी व्हायला पाहिजे. जय हिंद.. असं ट्विट संजय राऊत यांनी केलंय.

दिल्ली सीमारेषेवर गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरयाणाचे शेतकरीआंदोलन करत आहेत.केंद्र सरकारने संसदेत आणलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. सरकारशी चर्चेच्या फेऱ्या होऊनही त्यातून काहीच निष्पन्न होत नाही, हे चित्र असल्याने शेतकरी संघटनांनी 8 डिसेंबरला ‘भारत बंद’ची हाक दिली आहे.

Latest News