शेतकऱ्याच्या आंदोलनाला पाकिस्तान आणी चीन कडून रसद पुरवली जाते पिंपरी चे उपमहापौर केशव घोळवे यांची मुक्ताफळे राष्ट्रवादी काँग्रेस कडून जाहीर निषेध

या सभेच्या सुरवातीलाच जाचक शेतकरी कायद्यांच्या विरोधात विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी सभा तहकूबीची सुचना मांडली त्यास शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी अनुमोदन दिले. त्याचबरोबर नगरसेविका मंगला कदम यांनीही सभा तहकूब करा अन्यथा मतदान घ्या असे सुचविले त्यावर उत्तर देताना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपमहापौर केशव घोळवे यांनी दिल्लीमध्ये आंदोलन चालू आहे ते मँनेज केलेले आहे. या आंदोलनामध्ये आंदोलक भाडेकरु आहेत, त्यांना रोज ३०० रुपये भाड्याने आणलेले आहे. तसेच या आंदोलनास चीन व पाकीस्तानकडून रसद पुरविली जात आहे काय? अशी शंका व्यक्त करुन शेतकरी आंदोलनाची थट्टा उडविली.याबाबत महापालिका विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी निवेदन काढून निषेध व्यक्त केला आहे
दिल्लीतील शेतक-यांचे आंदोलन गेली -१२ दिवसापासून चालू असून या आंदोलनामध्ये पंजाब,बिहार व हरीयाणाचे शेतकरी स्वत: वाहने घेऊन दिल्लीपर्यंत पोहचले आहेत. हळूहळू संपूर्ण देशात या आंदोलनाचे लोण पसरत चालले आहे. त्याचाच परीपाक म्हणून आज देशव्यापी बंद पुकारलेला आहे.
असे असताना सुध्दा उपमहापौर केशव घोळवे यांनी या शेतकरी आंदोलनास भाड्याचे लोक आणले म्हणून तसेच या आंदोलनास पाकीस्तान व चीनकडून रसद मिळत आहे काय ? असे उदगार शेतकरी आंदोलनाबाबत भरसभे मध्ये काढून शेतक-यांची थट्टा उडविली. सदरची बाब अतिशय निंदनीय असुन देशातील तमाम शेतक-यांचा अपमान करणारी आहे. त्यामुळॆ मा. उपमहापौर केशव घोळवे यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जाहीर निषेध करते तसेच त्यांनी तमाम शेतकरी बांधवांची माफी मागावी अशी आग्रही मागणी केली आहे .