सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहर युवक काँग्रेस तर्फे ब्लँकेट वाटप

ps-final-edit

पुणे : पुणे शहर युवक काँग्रेस तर्फे अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांच्या वाढदिवसा निमित्ताने जाहिरातीचा खर्च टाळून गरजू लोकांना ब्लँकेट वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन पुणे शहर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सौरभ बाळासाहेब अमराळे यांनी केले असून कार्यक्रमास युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल मलके, विवेक कडू, प्रताप शिळीमकर, कुणाल काळे, विवीयन केदारी, धनराज माने, अक्षय नवगिरे आदी उपस्थित होते. डेक्कन येथील भिडे पुल, पुणे स्टेशन आणि ससून भागातील रस्त्यावर राहणार्‍या गरजू लोकांना सदर ब्लँकेट वाटप करण्यात आले.

अधिक माहितीसाठी संपर्क :
सौरभ बाळासाहेब अमराळे
( उपाध्यक्ष – पुणे शहर युवक काँग्रेस)

Latest News