निगडीतील भक्ती शक्ती उड्डाणं पुलाचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून उदघाटन

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी येथील भक्ती शक्ती चौकात उभारण्यात आलेल्या उड्डाण पूलाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या हस्ते हे उद्घाटन झाले.
यावेळी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेविका सुमनताई पवळे, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, युवती अध्यक्ष वर्षा जगताप, विशाल काळभोर, माजी शिक्षण मंडळ सभापती विजय लोखंडे, प्रवक्ते फजल शेख आदी उपस्थित होते.