पुणे रेस कोर्स येथील घोडा बेटिंग प्रकरणी शहर पोलिसांची मोठी कारवाई

pune-res-cours

पुणे रेस कोर्स येथील घोडा बेटिंग प्रकरणी शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, दोन बड्या बुकीसह तब्बल २७ जणांना ताब्यात घेतले आहे. ॲपद्वारे घोड्याच्या शर्यतीवर हे सर्व बुकी बेटिंग घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. पहाटे पाच पर्यंत ही कारवाई शहराच्या विविध भागात सुरु होती. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये बेटिंग घेण्याचा परवाना असलेल्या बुकींचा देखील समावेश असल्याचे समजते.

कोरोनामुळे रेसकोर्स येथील घोड्यांच्या शर्यती बंद आहेत. शासनाकडून अद्याप येथील बेटिंगची परवानगी देण्यात आलेली नाही. घोड्यांच्या सरावासाठी घोडे पळवले जातात. मात्र अधिकृत बुकींसह इतरही काहीजण ॲपद्वारे आपल्या घरातून बेटिंग चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. रेसकोर्स परिसरात अधिकृत बुकिंना बेटिंग घेण्यास परवानगी आहे. परंतु इतर ठिकाणाहून नाही असे पोलिसांनी सांगितले. अनेक बड्या असामींना पोलिसांनी अटक केली आहे.

Latest News