शुद्राला शूद्र म्हटलं तर त्यांना वाईट वाटतं. याचं नेमकं कारण काय आहे?


सिहोर | भाजपाच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर आता एका नव्या वादात सापडण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशातील एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी जातीव्यवस्थेबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वाद पेटू शकतो. एका कार्यक्रमादरम्यान बोलताना प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी वर्ण व्यवस्थेवरून प्रश्न उपस्थित केला. यावेळी त्यांनी जर शुद्राला शुद्र म्हटलं, तर वाईट वाटतं, असं विधान केलंय.
त्या म्हणाल्या, “क्षत्रियाला क्षत्रिय म्हटल्यास राग येत नाही, ब्राह्मणाला ब्राह्मण म्हटल्यास राग येत नाही. वैश्याला वैश्य म्हटलं तर राग येत नाही. मात्र जर शुद्राला शूद्र म्हटलं तर त्यांना वाईट वाटतं. याचं नेमकं कारण काय आहे?”
दरम्यान या गोष्टी जातीव्यवस्थेसंदर्भात गैरसमजूती असल्याने घडत आहेत असंही प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्यात.