1 जानेवारीपासून बँकिंग सिस्टममध्ये आणखी एक बदल होणार

rbi

नवी दिल्ली: पुढील वर्षाच्या सुरुवातीपासून अर्थात 1 जानेवारीपासून बँकिंग सिस्टममध्ये आणखी एक बदल होणार आहे. चेक पेमेंट करण्याच्या नियमांमध्ये हा बदल असणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) याबाबत नोटिफिकेशन जारी केलं आहे. त्यानुसार, लोकांना 50 हजार रुपयांहून अधिकच्या रकमेवर जारी करण्यात आलेल्या नियमांचं पालन करणं आवश्यक असणार आहे. बँकेने चेक पेमेंटमध्ये होणारी फसवणूक रोखण्यासाठी हे पाऊल उचललं आहे.

लागू होणार पॉझिटिव्ह पे सिस्टम –

आरबीआयने (RBI) दिलेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी 2021 पासून पॉझिटिव्ह पे सिस्टम लागू होणार आहे. या सिस्टममध्ये 50 हजारहून अधिकच्या पेमेंटसाठी दुसऱ्यांदा रि-कन्फर्म करावं लागेल. या सिस्टमअंतर्गत एसएमएस, मोबाईल अॅप, इंटरनेट बँकिंग आणि एटीएमद्वारे चेक लिहिण्याचा तपशील बँकेत जारी करावा लागेल. त्याद्वारे चेकची तारीख, पेमेंट करणाऱ्या व्यक्तीचं नाव, पेयी अर्थात रक्कम घेणाऱ्या व्यक्तीचं नाव, रकमेचे डिटेल्स द्यावे लागतील. ही सुविधा पूर्णपणे ऐच्छिक असेल.

बँकेत देण्यात आलेले सर्व डिटेल्स चेक केले जातील. यादरम्यान चेक ट्रंकेशन सिस्टममध्ये (CTS) कोणत्याही प्रकारची विसंगती आढळल्यास, बँक याबाबतची माहिती देईल आणि त्यात सुधारणा केल्या जातील.

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ची सुविधा विकसित करून बँकासाठी उपलब्ध करणार आहे. बँकांनी एसएमएस अलर्ट, बँक शाखांमधून, एटीएम, वेबसाईट आणि इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून पॉझिटिव्ह पे सिस्टमबाबत जागरुकता निर्माण करण्याचा सल्ला आरबीआयकडून देण्यात आला आहे.

Latest News