राऊतांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी – प्रविण दरेकर

sanjay-rau

मुंबई | विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधलाय. प्रविण दरेकर यांनी संजय राऊतांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केलीये. प्रविण दरेकर म्हणाले, “संजय राऊत यांची वक्तव्यं बेताल तसंच बेजबाबदार आहेत. आज त्यांनी सरळ न्यायालयाने काय केलं पाहिजे हे ते सांगितलं. त्यामुळे राऊतांवर कायदेशीर कारवाई व्हायला हवी.”

ते पुढे म्हणाले, “कोर्टावर अशा पद्धतीचं भाष्य करणं हा कोर्टाचा अवमान आहे. सर्वोच्च न्यायव्यवस्था असताना त्यांच्यावरच अशा प्रकारचे आरोप करणं चूक आहे. यासाठीच संजय राऊत यांच्यावक कारवाई करावी अशी ही मागणी आहे.”

कांजूरमार्ग मेट्रो कारशेडबाबत कोर्टाने दिलेल्या निर्णयावर संजय राऊत यांनी टीका केली. दरम्यान कोर्टाचा हा निर्णय दुर्देवी असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलंय.

Latest News