पडळकरांना पवार कळले कळलेच नाही -हसन मुश्रीफ

Hasan-Mushrif

कोल्हापूर | हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांवर निशाणा साधला होता. याच पार्श्वभूमीवर मंत्री आणि राष्ट्रावादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी पडळकरांना पवार कळले नसल्याचं म्हटलं आहे.

गोपीचंद पडळकर यांना अजित पवार काय आहेत, हे अजून कळलेले नाही. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अजित पवारांनी स्वत:ची ताकद दाखवून दिली असल्याचं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

धनगर समाजासाठी आरक्षण न घेताच गोपीचंद पडळकर भाजपकडून आमदार झाले. ही कशाची बक्षिसी आहे. गोपीचंद पडळकर यांना शरद पवार यांच्यावर बोलण्याचा अधिकार नाही. पातळ घालून नौटंकी करणारे आम्ही अनेकजण पाहिले असल्याचं मुश्रीफ म्हणाले.

दरम्यान, अजित पवार हे दिवसाला बदलत राहणारे नेते आहेत. भाजपचं सरकार होतं तेव्हा एखादी जरी नोटीस आली तरी ते टीव्हीसमोर रडत होते. आता मात्र एखादा टग्या असल्याचा आव आणत भाषणं देत सुटले असल्याची टीका पडळकरांनी केली होती.

Latest News