पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कार्यालय चक्क OLX वर विक्रीला

वाराणसी | OLX पे बेच दो…आपल्याला नको असलेल्या अनेक गोष्टी आपण OLX वर पोस्ट करून विकू शकतो. तर असंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कार्यालय चक्क OLX वर विक्रीला टाकल्याची घटना घडलीये. मोदींचं कार्यालय विकण्यास टाकत याची किंमत त्याची किंमत 7.5 कोटी रूपये ठरवण्यात आलीये. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केलीयेx
पंतप्रधान मोदींच्या वाराणसीतील कार्यालयाचा फोटो OLX वर टाकण्यात आलाय. या जाहिरातीमध्ये कार्यालयाची सर्व माहिती तसंच खोल्या आणि पार्किंगच्या सुविधेबद्दलही सांगण्यात आलंय.
पोलिसांच्या कारवाईनंतर ही जाहीरात हटवण्यात आलीये. वाराणसी पोलिसांनी यासंदर्भात एक व्हिडीयो पोस्ट करत या प्रकरणात कारवाई केली असल्याचं सांगितलंय. चार जणांना ताब्यात घेतलं असून एका अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलीये.