शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दिल्लीत जागा मिळाली तर आंदोलन करणार

images-22

अहमदनगर | नविन कृषी कायद्यांच्याविरोधात गेले जवळपास 24 दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहे. याच पार्श्वभूमावर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दिल्लीत रामलीला किंवा जंतर मंतर येथे जागा मिळाली तर आपण शेवटचे आंदोलन करणार आहोत, असं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.

दिल्ली आंदोलनातील शेतकऱ्यांच्या मुलांनी काल 20 डिसेंबर रोजी राळेगणसिद्धीत येऊन अण्णांची भेट घेतली. त्यावेळी ते म्हणाले की,”शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दोनदा आंदोलन केले. मोदी सरकारने दिलेले लेखी आश्वासन पाळले नाही. दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे.”

सरकारने अद्याप शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अद्याप कोणताच तोडगा काढला नसल्यामुळं शेतकरी अधिक आक्रमक झाले आहेत. येत्या 27 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रेडिओवर ‘मन की बात’ सुरू होताच देशभरातील शेतकऱ्यांनी थाळीनाद करीत आपला विरोध दर्शविणार असल्याचं आवाहन शेतकरी नेत्यांकडून करण्यात आलं आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेश गाजीपूर बॉर्डरवरून दिल्ली गाठणाऱ्या हजारो शेतकऱ्यांचे  ट्रॅक्टर जप्त करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. येत्या 24 तासांत ही कारवाई बंद नाही केल्यास महामार्गावरील दुसरी लेन रोखून धरण्यात येईल, असा इशारा व्ही. एम. सिंह यांनी दिला आहे.

Latest News