भाजपाचे औंध भागातील नगरसेवक विजय शेवाळे यांचे आज सकाळी निधन


पिंपरी: भारतीय जनता पार्टीचे औंध भागातील नगरसेवक विजय बाबुराव शेवाळे यांचे अल्पशा आजाराने आज सकाळी निधन झाले आहे. आज दुपारी 12:00 वाजता बोपोडी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील असे नीकटवर्तीयानी सांगितले. खड्की, औंध परिसरातील सामजिक उपक्रमात त्यांचा सहभाग असायचा. शेवाळे हे कॉंग्रेसचे जुने कार्यकर्ते होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच भाजपा व कॉंग्रेस वर्तुळात हळहळ व्यक्त करण्यात आली. विजयरावांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली