देशातील शेतकऱ्यांची अशी अवस्था आहे त्याअर्थी देश खूप मागे चालला – सयाजी शिंदे

Untitled-1-6

पुणे | गेल्या अनेक दिवसांपासून राजधानी दिल्ली येथे कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन चालू आहे. केंद्र सरकार जातीने लक्ष घातल नसल्याचं दिसत आहे. तर दुसरीकडे शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. अशातच प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

एक देश मागे गेला म्हणजे या देशातील शेतकरी मागे गेला. देश पुढे गेला म्हणजे एक शेतकरी पुढे गेला. ज्याअर्थी आपल्या देशातील शेतकऱ्यांची अशी अवस्था आहे त्याअर्थी देश खूप मागे चालला असल्याचं सयाजी शिंदे यांनी म्हटलं आहे.

सर्वांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. शेतकरी पुढे गेला तरच देश पुढे गेला हे सर्वांनी समजून घेतलं पाहिजे असल्याचं शिंदे म्हणाले. पपिंपरी-चिंचवडमध्ये पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेण्यासाठी ते आले होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

दरम्यान, 12 वर्षांपूर्वी महानगरपालिकेकडून एक एकर चाळीस गुंठे जागा निमा या संस्थेने विकत घेतली होती. ओसाड जागेत निमा संस्थेने वनराई फुलवली असून साडेचारशे झाडं लावली. मात्र एमआयडीसीने विकल्याचं सांगून काही जण महानगरपालिकडे झाड तोडण्यास सांगत आहेत. ती झाडं वाचवायची आहेत. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचंही शिंदेंनी यावेळी सांगितलं.

Latest News