महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन च्या वतीने आयोजित ऑनलाईन निबंध आणि पोस्टर स्पर्धेस चांगला प्रतिसाद मिळाला . ‘कोविड चा अध्ययन आणि अध्यापनावरील परिणाम ‘ या विषयावरील निवंध स्पर्धेत शाहिस्ता शेख प्रथम ,शबाना शेख द्वितीय ,मेघा साळुंखे तृतीय आली . ई -पोस्टर स्पर्धेत कल्याणी रेड्डी ,सानिया सय्यद प्रथम ,समरीन शेख द्वितीय ,शबाना शेख तृतीय आली . रिझवाना दौलताबाद ,अनुराधा रेड्डी ,रेश्मा शेख ,जोसेफ फ्रान्सिस यांनी अभिनंदन केले .