आंतरशालेय संगणक ज्ञान स्पर्धेचे पारितोषिक वितरण

IMG-20210101-WA0305

आंतरशालेय संगणक ज्ञान स्पर्धेचे पारितोषिक वितरण

पुणे :(प्रतिनिधी )

महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या पी ए इनामदार आय सी टी अकँडमी तर्फे आयोजित १४ व्या राष्ट्रीय आंतरशालेय संगणक ज्ञान स्पर्धेचे पारितोषिक वितरण एजिलियड टेक्नॉलॉजीसचे सॉफ्टवेअर इंजीनिअर रईस इकबाल,तसेच माजी विद्यार्थी अमीर खान यांच्या हस्ते झाले.डॉ पी ए इनामदार अध्यक्ष स्थानी होते.दहा हजार सातशे विद्यार्थी सहभागी झाले.विजेत्या विद्यार्थ्यांना तसेच ३ शाळांना आय टी आयकॉन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.त्यात अँग्लो उर्दू बॉईज हायस्कुल,पुणे महानगरपालिकेची शाळा नंबर १२९,हाजी अब्दुल कादिर मेमन इंग्लिश मिडीयम स्कुलचा समावेश होता.एकूण ९८ पारितोषिके देण्यात आली . आबेदा इनामदार,ऋषी आचार्य,इफ्तेकार इनामदार उपस्थित होते. ऍकेडमीच्या संचालक मुमताज सय्यद यांनी स्वागत केले.


Latest News