ऑनलाईन भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा…

पुणे शहराच्या पूर्व भागातील सुमारे 15 लाख लोकांना सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी पुणे महापालिकेच्या ‘भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पा’ चा ऑनलाईन लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. पुणे शहर किंवा पिंपरी चिंचवड येथील वाढत्या लोकसंख्येचा भार शेती क्षेत्राला कदापि पेलवणारा नाही. पाणी हे जरी इकॉनॉमी कमोडिटी असले तरी त्याचा सर्वार्थाने योग्य वापर होणे गरजेचे आहे, असं फडणवीस म्हणाले. पुण्याची लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढत आहे.
साडे पाच टीएमसी पाण्याची गरज असणाऱ्या पुणे शहराला आता साडेअठरा टीएमसी पाणी लागत आहे. जवळपास दोन लाख एकराला बारा महिने पुरेल एवढे पाणी पुणेकरांना देण्यात येत आहे. त्यात उपकार करत नाही ती शहराची आवश्यकता आहे, असं अजित पवार म्हणाले.