संभाजीनगर नामांतराला आमचा विरोध…

प्रतिनिधी: औरंगाबादचे संभाजीनगर झाले नाही. मात्र, या नावबदलासाठी हलचाली सुरू असल्याचे वृत्त माध्यमांत झळकले. त्यानंतर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी, आमचा त्यास विरोध असल्याचं ठामपणे सांगितलं. आता, केंद्रीयमंत्री रामदास आठवलेंच्या रिपाइं पक्षानेही नामांतरणाला आपला विरोध दर्शवला आहे.औरंगाबादच्या नामांतरणावरुन आता चांगलंच राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसने नामांतराला विरोध दर्शवल्यानंतर आता रिपाइं आठवले गटानेही या नामांतराला विरोध असल्याचं सांगितलंय. रामदास आठवलेंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन औरंगाबादच्या नामांतराला आपला विरोध असल्याचं स्पष्ट केलंय औरंगाब चे नाव बदलण्यास रिपब्लिकन पक्षाचा तीव्र विरोध राहील

Latest News