”तोतया” जागेचा बनावट दस्तऐवज करून जागेवर ताबा, वाणवाडी पोलिसात गुन्हा दाखलं

पुणे (प्रतिनिधी )मेहबूब शेख उर्फ पिट्याभाई व त्याच्या साथीदारांनी जागेचा बनावट दस्तऐवज बनवला. यानंतर महिलेच्या जागेवर ताबा मारला.पत्र्याच्या खोल्या बांधून त्या बांगलादेशी नागरिकांना भाड्यानं दिल्या. सदर महिलेस मेहबूब शेख उर्फ पिट्याभाई याने सय्यदनगर व मुंबई येथे तिच्या राहत्या घरी वारंवार धमकावले तसेच जीवे ठार मारण्याचीही धमकीही दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार मेहबूब शेख उर्फ पिट्याभाई पोलीस निरीक्षकाचा गणवेश घालून नागरिकांना मी सीआयडी ऑफिसर आहे, ह्यूमन राईट्सचा पदाधिकारी व परिवर्तन संस्थेचा अध्यक्ष आहे तसेच पत्रकार असल्याची तोतयागिरी व बतावणी करत होता. याप्रकारे दहशत माजवत जागा लुबाडने,खंडण्या गोळा करणे असे उद्योग करत असतो. तसेच विविध मान्यवर आणि राजकारणी व नामांकित गुंड यांच्यासोबतचे फोटो दाखवून हे नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत असतो. पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार वानवडी पोलिसांनी दाखल केले आहेत. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक जोगदंड करत आहेत.