खराडी भागाता आयटी कंपनीत काम करणाऱ्या महिलेवर बलात्कार

पुणें ( परिवर्तनाचा सामना ऑनलाईन न्यूज )
पुण्यात महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसते आहे. खराडी परिसरातली एक धक्कादायक घटना नुकतीच उजेडात आल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. 20 वर्षांची एक तरुणी खराडीतल्या कॉल सेंटरमध्ये काम करते. ती कामावरून घरी परत येत असताना तरुणाने तिची गाडी भर रस्त्यात अडवली. तिला मारहाण करून बलात्कार केल्याची घटना नुकतीच घडली आहे
. तिला मारहाण करत आपल्या बाइकवर बसवलं आणि खराडीजवळ निर्मनुष्य भागात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. पुन्हा तिला गाडीवर बसवून येरवडा परिसरात आणून सोडलं. घटनेचा धक्का बसलेल्या तरुणीने तिथून आपल्या मित्राला फोन केला आणि घटनेची माहिती दिली. या तरुणीने अज्ञात तरुणाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलीस पुढचा तपास करत आहेत.