वेताळ टेकडीवर फिरायला गेलेल्या मुलाचा अग्निशमक दलाने एकाच जीव वाचवला


पुणे ( प्रतिनिधी ) वेताळ टेकडीवर फिरण्यासाठी गेला असताना होता. त्यावेळी उभ्या असलेल्या तनिष्कचा पाय घसरला. त्यामुळे तो खोल खाणीत कोसळला. त्यानंतर त्याठिकाणी असलेल्या नागरिकांनी अग्निशमन दलाच्या जवानांना माहिती दिली. त्यानंतर फायरमन संजय भावेकर यांनी खोल खाणीत उतरून जखमी तनुष्कला बाजुला आणले
तनिष्क विशाल लोढा (वय 16) असे या तरुणाचे नाव आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या इतर जणांनी जाळीच्या साह्याने जखमी तनिष्काला बाहेर काढले. एक तरुण पाय घसरल्याने कोथरूड परिसरातील वेताळ टेकडीवरून खाली कोसळला. नागरिकांनी याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना दिल्यानंतर दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तरुणाला जाळीच्या सहाय्याने वर काढत जीव वाचविला आहे. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.