भोसरीत ”प्रेमसंबंधातून एकावर जीवघेणा हल्ला

पिंपरी (PS Online News) प्रेम संबंधाच्या कारणावरुन भोसरीत एकावर जिवघेणा हल्ला झाला आरोपी किरण याने त्याच्याकडे असलेल्या कटरने अभिषेकचा गळा कापून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी किरण विरोधात खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. अभिषेक उर्फ आकाश मधूकर कांबळे (वय-26) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर किरण शिवाजी थोरात (वय-23 रा. बालाजी नगर झोपडपट्टी भोसरी) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी शुभम मधूकर कांबळे (वय-20 रा. बालाजी नगर झोपडपट्टी, भोसरी याने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास जखमी अभिषेक आणि आरोपी मित्र हे दोघेजण दुचाकीवरून इंद्रायणीनगर कडून बालाजीनगरकडे जात होते. त्यावेळी हा परकार घडला पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पंचमुख करीत आहेत.

Latest News