”कोविशिल्ड” जागतिक महामारी विरोधात भारताच्या लढाईतील एक निर्णायक क्षण- पंतप्रधान नरेंद्र मोदी

आज लसीकरणाच्या प्रक्रियेतला सर्वात मोठा टप्पा पार पडला आहे. ही अभिमानाची बाब आहे की ज्या दोन लसींना आपात्कालीन वापरासाठी संमती दिली गेली आहे, त्या दोन्ही लसी मेड इन इंडिया आहेत. हे आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी आपल्या शास्त्रज्ञांची इच्छाशक्ती दर्शवते. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जागतिक महामारी विरोधात भारताच्या लढाईतील एक निर्णायक क्षण असं मोदींनी या क्षणाचं वर्णन केलं आहे.
“जागतिक महामारी विरोधातील भारताच्या लढाईतील एक निर्णायक क्षण! सीरम आणि भारत बायोटेकच्या लसींना डीसीजीआयच्या मंजुरीमुळे एक स्वस्थ आणि कोविडमुक्त भारताच्या मोहीमेस बळ मिळेल. या मोहीमेसाठी जीवतोडून प्रयत्न करत असलेल्या शास्त्रज्ञ-नवनिर्मात्यांना शुभेच्छा व देशवासियांचे अभिनंदन तो आत्मनिर्भर भारत, ज्या आधार आहे – सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया