पिंपरीतील वायसीएम रुग्णालय सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले

पिंपरी प्रतिनिधी : परिवर्तनाचा सामना ऑन लाईन: महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात सध्या रोज 15 ते 20 शस्त्रक्रिया होत आहेत. तर दिवसाला 20 ते 25 महिलांची प्रसूती केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आणि पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, राज्यासह पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या आता आटोक्यात आली आहे. अगदी मोजक्या संख्येने आता कोरोना रुग्ण मिळत आहेत. पिंपरी चिंचवड प्रशासन आणि आरोग्य विभागाने कोव्हिड काळात नागरिकांची चांगली काळजी घेतली. गेले नऊ महिने पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा प्रसार झाला. दररोज कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीय होती तसंच मृतांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत होती. महाराष्ट्रात तर पुणे-पिंपरी चिंचवडची कोरोना रुग्णसंख्या चिंतेचा विषय बनली होती. अशा परिस्थितीत महापालिकेच्या वायसीएम रुग्णालय रुग्ण मोठ्या प्रमाणावर दाखल होऊन बरे झाले. कोरोनाचा बिमोड करण्यात आणि रुग्णांनी आजारावर मात करण्यात वायसीएमचा मोठा वाटा आहे.

Latest News