पिंपरी महापालिकेतील १८ ठेकेदारांवर गुन्हे दाखल करून कायम स्वरूपी ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे

पिंपरी प्रतिनिधी ऑन लाईन परिवर्तनाचा सामना: 18 ठेकेदारांवर तत्काळ फौजदारी स्वरूपाची गुन्हे दाखल करून कायम स्वरूपी ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी बहुजन सम्राट सेनेचे संतोष निसर्गंध, डॉ, बाबासाहेब आंबेडकर ग्रपचे सतीश कदम यांनी केली. त्याच बरोबर कारवाई करण्यास चालढकल करणाऱ्यां प्रभागाचे कार्यकारी अभियंता, बीआरटीएस, ईडब्ल्यूएस प्रकल्प अधिकारी व

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यावर देखील कादेशीर कारवाई करण्यात यावी, सर्व प्रभागाचे कार्यकारी अभियंता, बीआरटीएस, ईडब्ल्यूएस प्रकल्प अधिका-यांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. सर्वांनी चिडीचूप भूमिका घेतली आहे. प्रत्येक जण एकमेकांकडे बोट दाखवून तक्रार देण्यास नकार देत आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेतील टेंडर मिळविताना ‘बनावट फिक्स्ड डिपॉझिट रिसीट एफडीआर’ आणि बँक हमी देऊन महापालिकेची फसवणूक करणा-या १८ ठेकेदारांवर फौजदारी कारवाई करण्यास चालढकल केली जात आहे. अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. महापालिकेची विकास कामे घेताना ठेकेदारांनी बोगस एफडीआर, बँक हमी दिल्याचे आढळून आले आहे. त्या १८ ठेकेदरांना तीन वर्षासाठी काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.

त्यांची नावे महापालिकेने जाहीर केली आहेत. त्या ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश स्थायी समिती सभेत देण्यात आले होते. तरी देखील संबंधित ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी चालढकल केली जात आहे. याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार कोणी द्यायची यावरुन शहर अभियंता, त्यामुळे ठेकेदारांना पाठबळ मिळत आहे. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनीही दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सदर तक्रार निवेदनाची दखल घेऊन महापालिकेचे अधिराकाऱ्यां सह  आयुक्तांवर देखील कारवाई करण्यात यावी

Latest News