11 गावांमधील शाळा, बालवाड्या, अंगणवाड्या पालिकेकडे वर्ग कराव्यात….

supriya-s

पुणे प्रतिनिधी: परिवर्तनाचा सामना: खासदार सुप्रिया सुळे यांनी महापालिका आयुक्तांना विक्रम कुमार यांची भेट घेऊन त्यांना मागणीचे पत्र दिले. समावेश झालेल्या ११ गावांमधील शाळा, बालवाड्या, अंगणवाड्या, त्यांच्या अस्थापना अजूनही जिल्हा परिषदेकडेच आहेत. त्या पालिकेकडे वर्ग कराव्यात. तसेच पालिकेत वर्ग झालेल्या ग्रामपंचायत कर्मचा-यांना पालिकेच्या आरोग्य आदी सेवा दिल्या जाव्यात. या गावांमधील निधी अभावी थांबलेली कामे आगामी अंदाजपत्रकात तरतूद करुन कामे पुर्ण करावीत.यावेळी महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, खडकवासला विधानसभा अध्यक्ष काका चव्हाण, त्रिंबक मोकाशी, नगरसेवक सचिन दोडके, गणेश ढोरे, वंदना धुमाळ, भरत झांबरे उपस्थित होते. नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधून ग्रामपंचायत आणि पालिकेकडून गोळा केल्या जाणाऱ्या करामध्ये तफावत आहे. पालिकेचा कर जास्त असूनही पायाभूत सुविधा मात्र पुरविल्या जात नाहीत. पालिकेची कर आकारणी ग्रामपंचायत कराच्या दीड पटीपेक्षा अधिक नसावी.

Latest News