पिंपरी-चिंचवड शहर पोलिस दलातील सर्व पोलिसांना स्मार्ट वॉच/सायकल देणार

पिंपरी प्रतिनिधी: परिवर्तनाचा सामना: पोलिसांना कायम फिट ठेवण्याच्या हेतूने घेण्यात येणारा हेल्थ 365 हा कार्यक्रम उद्या सकाळी नऊ वाजता प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात होणार आहे.आपल्या आरोग्याकडं दुर्लक्ष करणाऱ्या पोलिसांना स्मार्ट वॉच आणि सायकलद्वारे आरोग्याकडं लक्ष ठेवता येणार आहे. या दोन्ही वस्तूंचं वाटप राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. अल्ट्रामॅन आणि आर्यनमॅन हा जागतिक पुरस्कार कृष्ण प्रकाश यांनी मिळवला आहे. हा पुरस्कार मिळवणारे कृष्णप्रकाश हे नागरी सेवेतील पहिलेच अधिकारी आहेत. तंदुरुस्त आणि फिट आयपीएस अधिकारी असलेले पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी आपल्या सहकारी पोलिसांनाही फिट ठेवण्याचा विडा उचलला आहे. त्यासाठी ते शहर पोलिस दलातील सर्व पोलिसांना स्मार्ट वॉच तसेच सायकल देणार आहेत.