भाजपला नाशिकमध्ये खिंडार…

नाशिक: भाजपचे नेते वसंत गीते आणि सुनील बागुल आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या नेत्यांनी कालच शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. आज संध्याकाळी 6 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचा शिवसेनाप्रवेश होणार आहे. नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. याचे कारण नाशिकमधील भाजपचे दोन बडे नेते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी गेल्या महिन्यात 21 डिसेंबरला भाजपमध्ये प्रवेश करत शिवसेनेला मोठा धक्का दिला होता. आता शिवसेनेने भाजपचे दोन मोठे नेते फोडले आहेत.

Latest News