बोगस एफडीआर प्रकरण दाखवा… उपमुख्यमंत्री अजित पवार


पिंपरी प्रतिनिधी: परिवर्तनाचा सामना: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलिसांना स्मार्ट वॉचचे वाटप पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ते चिंचवड येथे पत्रकारांशी बोलत होते. बोगस एफडीआर आणि बँक हमी देवून कंत्राट घेत काही ठेकेदारांनी महापालिकेची फसवणूक केली आहे. त्यातील 18 ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात आले. तर, फसवणूक केल्याप्रकरणी पाच ठेकेदारांविरोधात गुन्हा दाखल करण्याची तक्रार महापालिकेने पोलिसांकडे दिली आहे. याबाबत विचारले असता पवार म्हणाले, ”बोगस एफडीआर प्रकरण दाखवा. त्याचे पुरावा द्या. चौकशी लावतो. तसेच महापालिकेत बरंच काही चाललं आहे. असे कानावर येते. फक्त कानावर येवून चालत नाही. त्याचे पुरावे असतील तर मी त्याची चौकशी लावतो
