पॉर्न बघून वेगवेगळ्या प्रकारे संबंध प्रस्थापित करण्याच्या नादात तरुणाने जीव गमावला…

नागपूर: नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका लॉजवर घडली आहे. या घटनेत मृत्यू झालेला तरुण हा 27 वर्षीय असून तो इंजिनिअर आहे, या तरुणाचे गेल्या काही दिवसांपासून 20 वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध जुळले होते. शुक्रवारी दोघांनीही फिरायला जाण्याचा बेत आखला. दोघेही दहेगाव परिसरातील लॉजवर गेले आणि त्यांनी एक खोली बुक केली होती. यावेळी वेगवेगळ्या पोजिशनमध्ये शाररिक संबंध प्रस्तावित करताना दोघांनी दोरीचा उपयोग केला. तरुण खुर्चीवर बसल्यानंतर तरुणीने त्याचे हात-पाय दोरीने बांधले. या पोजिशनमध्ये सेक्स झाल्यानंतर तरुणी बाथरूममध्ये गेली, यावेळी तरुण खुर्चीसह खाली कोसळला. ज्यामुळे फास लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, घाबरलेल्या तरुणीने लॉज व्यवस्थापकांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तरुणाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. नागपूरमध्ये एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मोबाईलवर पॉर्न फिल्म बघून वेगवेगळ्या प्रकारच्या पोझिशनमध्ये शारारिक संबंध प्रस्थापित करण्याच्या नादात एका तरुणाला गळफास लागून जागीच मृत्यू झाला आहे.