भंडाऱ्यात आगीत होरपळून नवजात बालकांचा झालेला मृत्यु ही अतिशय दु:खद- प्रवीण दरेकर

मुंबई | भंडाऱ्यात आगीत होरपळून नवजात बालकांचा झालेला मृत्यु ही अतिशय दु:खद व हृदय हेलावणारी घटना आहे. यातून ग्रामीण रुग्णालयाच्या व्यवस्थेतील दोष आणि कमतरता पुढे आल्या आहेत. चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.तसेच इतर बालकांना वाचवण्यासाठी ज्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले असतील, त्यांचंही मी अभिनंदन करतो. त्याचबरोबर राज्य सरकारनं संपूर्ण आरोग्य व्यवस्था मजबूत करावी, अशी मागणीही प्रविण दरेकर यांनी केली आहे.  भंडारा जिल्हा सरकारी रुग्णालयात लागलेल्या आगीत 10 बालकांचा मृत्यू झाला. या घटनेमुळं महाराष्ट्रासह संपूर्ण  देश होरपळुन गेला आहे. यातच विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांना या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत भंडाऱ्याच्या घटनेची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.