भंडारा नवजात शिशू केअर युनिटमधील दोषींवर कडक कारवाई करणार


मुंबई : भंडारा नवजात शिशू केअर युनिटमधील बालकांचे मृत्यू म्हणजे हत्या असल्याचे म्हटले आहे. तर राज्य सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करून दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे. या घटनेसाठी उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार आहे. घटनेसाठी जबाबदार असलेल्या दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील नवजात शिशु केअर युनिटमध्ये मध्यरात्री जवळपास दोनच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. यामध्ये धुरामुळे गुदमरुन 10 बालकांचा मृत्यू झाल्याचे समजते. या युनिटमध्ये एकूण सतरा बालकं होती.