पुणे महापालीकेचे पाणी धानोरी,लोहगाव भागाला पाणी मिळणार:आ सुनील टिंगरे

पुणे प्रतिनिधी (परिवर्तनाचा सामना ऑनलाईन न्यूज ) आमदारयोजनेतून होणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या वितरणाबाबच्या बैठकीला पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अधिक्षक अभियंता अनिरुद्ध पावसकर, कार्यकारी अभियंता नंदकिशोर जगताप, मनिषा शेकटकर, सुदेश कडू, विनोद क्षीरसागर आदीसह अनेक अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार शनिवारपासून (दि. ९) भामा आसखेडचे प्रत्यक्षात नागरिकांना मिळण्यास सुरवात होणार आहे. तीन टप्यात या पाणी पुरवठ्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. त्यानुसार पहिल्या टप्यात आजपासून संपूर्ण धानोरी आणि लोहगाव भागाला पाणी मिळणार आहे. सद्यस्थितीला लोहगाव भागात सर्वाधिक पाणी टंचाई असून आता आठ दिवसांनी पाणी मिळत आहे. मात्र, भामा आसखेडमधून पाणी मिळणार असल्याने हा कालावधी तीन ते चार दिवसांवर येईल, असा विश्वास आमदार टिंगरे यांनी व्यक्त केला. तर या योजनेतून दुसऱ्या टप्यात म्हणजे साधारण महिनाभराने वडगाव शेरी आणि विमाननगर परिसराला पाणी मिळणार आहे. त्यानंतर तिसऱ्या टप्यात फुलेनगर, प्रतिकनगर, नागपूर चाळ, हाऊसिंग बोर्ड या भागाला पाणी पोहचेल आणि शेवटच्या टप्प्यात येरवडा, टिंगरेनगर, कळस यासह उर्वरित भागाला पाणी मिळणार आहे. भामा आसखेड योजनेतून सुरू झाल्यानंतर सर्व यंत्रणा सुरळीत होण्यास कालावधी लागणार असल्याने टप्याटप्याने पाणी पुरवठा होणार असल्याचे प्रशासनाकडून या बैठकीत सांगण्यात आल्याचे आमदार टिंगरे यांनी सांगितले.