महाविकास आघाडीत पहिल्या पासूनच बिघाड – आशिष शेलार

मुंबई पालिका निवडणुकांमध्ये नेहमी शिवसेनेचा महापौर झाला. यापुढे शिवसेना आणि भाजप वेगळी निवडणूक लढणार असल्याने राज्यातील सर्व महापालिकांवर भाजपचाच महापौर निवडून येणार असल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडीमध्ये पहिल्यापासूनच बिघाड आहे. ही बिघडलेली आघाडी आहे. यांनी राज्याला बिघडवू नये एवढीच आमची इच्छा आहे असं म्हणत शेलारांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुका काही दिवसांवर आल्या आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीवर सर्वांच लक्ष आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. आम्ही स्वबळावर लढणारे आहोत. ते तिघेही दुर्बल असल्याची टीकाही शेलारांनी केली.