पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वच रुग्णालयांचे फायर सेफ्टी ऑडिट करा – सीमा साळवे


पिंपरी चिंचवड प्रतिनिधी (परिवर्तनाचा सामना ऑन लाईन 🙂 भंडारा जिल्हा रुग्णालयातील दुर्घटना पुन्हा कुठेही होऊ नयेत यासाठी प्रशासनाने खबरदारी घेण्याची गरज आहे. फक्त आगीच्या दुर्घटना घडल्यावरच प्रशासन खडबडून जागे होत असते, हे बरोबर नाही. पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरातील सर्वच रुग्णालयांचे फायर सेफ्टी ऑडिट केले पाहिजे. अनेक रुग्णालयांची फायर सिस्टम नाममात्र आहे किंवा नादुरुस्त आहे. महापालिकेच्याच नाही तर अनेक खासगी रुग्णालयांतील फायर सिस्टिम नियमित तपासणी करणे गरजेचे आहे. अग्निशमन विभागाकडून किमान दर सहा महिन्यांतून एकदा फायर सेफ्टी ऑडिट करावे अशी मागणी माजी स्थायी समिती अध्यक्ष सीमा सावळे यांनी केली आहे