पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी अभिषेक बारणे यांची निवड..

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाच्या निवडीसाठी आज पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामधील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृह येथे स्थायी समितीची विशेष सभा पार पडली.
सदर विशेष सभेत स्थायी समिती सभापती पदासाठीची निवडणूक प्रक्रिया पार पडली. स्थायी समिती सभापती पदासाठी प्राप्त नामनिर्देशन अर्जांची छाननी करण्यात आली असता अभिषेक बारणे यांचा एकमेव अर्ज वैध ठरला. इतर कोणताही अर्ज प्राप्त न झाल्यामुळे अभिषेक बारणे यांची स्थायी समिती सभापती पदावर बिनविरोध निवड झाल्याचे पिठासीन अधिकारी एम.जे.प्रदीप चंद्रन यांनी जाहीर केले.
निवडणूक कार्यालयास आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, नगरसचिव मुकेश कोळप,मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रविणकुमार जैन, मुख्य लेखापरीक्षक प्रमोद भोसले, विशेष अधिकारी किरण गायकवाड तसेच महापालिका विविध विभागप्रमुख उपस्थित होते,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले. या निवडीनंतर महापौर रवि लांडगे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, उपमहापौर शर्मिला बाबर यांच्यासह नगरसदस्य व नगरसदस्या यांनी सभापती अभिषेक बारणे यांचे अभिनंदन केले.
