मुंडे यांची आरोपातून मुक्तता होत नाही, तोपर्यंत….


परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले झाली, असा धक्कादायक खुलासा केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात गदारोळ सुरु झाला आहे. याप्रकरणात भाजपाने उडी घेतली असून भाजपा नेते यांनी मुंडे यांना जोपर्यंत आरोपातून मुक्त होत नाही, तोपर्यंत मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.3 महिलांशी संबंध असलेले मंत्री धनंजय मुंडे यांनी सद्य परिस्थिती स्पष्ट होईपर्यंत महाराष्ट्र मंत्रिमंडळातून बाहेर रहावे याबाबतचा व्हिडीओ किरीट सोमय्या यांनी ट्वीट केला आहे. तसेच त्या व्हिडीओमधून किरीट यांनी मुंडे यांच्यावर टीकास्त्र सोडून जे आरोप होत आहेत, त्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मिता, संस्कृतीला धक्का पोहचला असून जोपर्यंत धनंजय मुंडे यांची आरोपातून मुक्तता होत नाही, तोपर्यंत त्यांना मंत्रीमंडळात राहण्याचा अधिकार त्यांना नाही