कर्जदाराने आत्महत्या केल्यास कर्ज देणाऱ्यावर गुन्हा नोंदवणं योग्य नाही:मुंबई हायकोर्ट

मुंबई ( प्रतिनिधी )कर्जदाराने आत्महत्या केल्यास कर्ज देण्याऱ्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवणं योग्य ठरणार नाही, असं महत्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं नुकत्याच दिलेल्या एका निकालात नोंदवलं आहे.

मृत व्यक्तीचे प्रमोद प्रकाश असे नावं असून त्यांनी नवीन वाहन खरेदी करण्यासाठी याचिकाकर्ते रोहित काम करीत असलेल्या ‘महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड’कडून 6 लाख 21 हजार रुपयांचं कर्ज घेतलं होतं.

झालेल्या करारानुसार प्रमोद यांनी कर्जाची रक्कम चार वर्षांत 17 हजार 800 रुपयांचा मासिक हप्ता देऊन परतफेड करणं आवश्‍यक होतं. यापैकी फक्त 15 हजार 800 रुपये भरून उर्वरित रक्कम नंतर देण्याचे आश्वासन त्यांनी कंपनीला दिलं. त्या एका कारणासाठी याचिकाकर्त्यांनी मृत व्यक्तीस आत्महत्येस प्रवृत्त केलं असं म्हणता येणार नाही

Latest News