70टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्येमध्ये प्रतिकार क्षमता निर्माण होणे गरजेचे – who


जिनिव्हा – जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख संशोधकांनी म्हटले आहे.सोमवारी प्रसिद्धी माध्यमांबरोबरच्या वार्तालापादरम्यान डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी हा इशारा दिला आहे. लसीकरण होत असलेल्या देशांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन अतिशय कसोशीने केले जायला हवे. तरच करोना विरोधी लसीचा परिणाम दिसून येईल, असे त्यांनी म्हटले आहे. लिकडच्या आठवड्यांत ब्रिटन, अमेरिका, फ्रान्स, कॅनडा, जर्मनी, इस्त्राईल, नेदरलॅंड्स आणि इतर देशांनी आपल्या कोट्यावधी नागरिकांना करोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी लस देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे एकप्रकारची निष्काळजी निर्माण होण्याची शक्यता आहे.जरी लस दिली गेली तरिही 2021 मध्ये सामूहिक प्रतिकारशक्ती निर्मण होऊ शकणार नाही. जरी काही देशांत अगदी निवडक ठिकाणी जरी अशी सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण झाली, तरी त्यामुळे जगभरातील लोकांचे रक्षण होणार नाहीसामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी लोकसंख्येतील 70 टक्के लोकसंख्येमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होणे आवश्यक असते. तरच संपूर्ण लोकसंख्येला प्रतिकारशक्तीचा लाभ मिळू शकतो. कोविड-19 सारख्या अतिशय संसर्गजन्य रोगाला आटोक्यात आणण्यासाठी 70 टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्येमध्ये प्रतिकार क्षमता निर्माण होणे गरजेचे आहे, असे संशोधकांचे मत आहे.करोना विरोधी लसीकरणामुळे या महिन्यात किंवा फेब्रुवारीमध्ये काही देशांमध्ये सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होण्यास सुरुवात होईल.