”VOTE CHOR” च्या तक्रारींनंतर पुणे महापालिका प्रशासनाने अखेर या याद्यांची फेरपडताळणी करण्याचा निर्णय…  

vote chor

पुणे: (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)

राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पुणे महापालिकेने प्रभागांनुसार मतदार याद्यांचे विभाजन सुरू केले होते. मात्र, या प्रक्रियेदरम्यान काही इच्छुकांनी अनधिकृत हस्तक्षेप करून त्यांना प्रतिकूल असणाऱ्या मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात हलवण्याचे, तसेच अनुकूल मतदारांचे नावे स्वतःच्या प्रभागात आणण्याचे प्रकार समोर आले. या व्होट चोरीच्या घटनांवर माध्यमांमध्ये वृत्त प्रसिद्ध करताच, महापालिकेने तपासाची लगबग सुरू केली. निवडणूक आयोगाच्या “बेकायदेशीर आणि सदोष” कार्यपद्धतींवर प्रकाश टाकण्यासाठी महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी आज म्हणजेच १ नोव्हेंबर २०२५ रोजी मुंबईत मोठ्या संयुक्त सत्य मार्चचे आवाहन केले आहे. यावेळी महाविकास आघाडीची एकजूट दिसून आली. विशेषतः मतदार यादीतून अंदाजे १ कोटी बनावट किंवा डुप्लिकेट नावे काढून टाकण्याची मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात आली आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरेयांनी मतदार यादीतील घोळ यावरून जोरदार तोफ डागली आहे.प्रभागनिहाय मतदार याद्यांतील अनियमितता आणि व्होट चोरी’च्या तक्रारींनंतर  pune महापालिका प्रशासनाने अखेर या याद्यांची फेरपडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. याद्यांमध्ये झालेल्या गोंधळाची गंभीर दखल घेत निवडणूक विभागाने नुकतेच आदेश जारी केले असून, सहाय्यक आयुक्तांकडे या कामाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.मतदार याद्यांमधील चुका दूर करण्यासाठी सहाय्यक आयुक्तांना त्यांच्या हद्दीतील सीमारेषा प्रत्यक्ष पाहणी करून तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे काम पुढील दोन दिवसांत पूर्ण करून अहवाल सादर करण्याची मुदतही ठरवण्यात आली आहे. एकूण २८ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून, मतदार यादी पदनिर्देशित अधिकारी रवी पवार यांनी यासंबंधीची यादी जाहीर केली आहे.मनसे अध्यक्ष राज ठाकरे ‘सत्य मार्च’ यांनी मोर्चाला संबोधन केले. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले, “आजचा मोर्चा हा राग दाखवण्याचा, ताकद दाखवण्याचा मोर्चा आहे. या विषयांमध्ये सर्वजण बोलले आहेत. खरेतर छोटे विषय आहेत. फार मोठा विषय नाही हा. यामध्ये दुबार मतदार आहेत. हे सर्वजण बोलत आहेत. इतकेच काय तर महायुतीचे नेते देखील म्हणत आहेत. मग तुम्हाला अडवले कोणी? निवडणूक घेण्याची घाई का करता? मतदार याद्या साफ केल्यानंतर निवडणुका घ्या.” मतदार यादी विभाजनाच्या प्रक्रियेत काही ठिकाणी चुका झाल्या आहेत, त्या त्वरित दुरुस्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत,असे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.

Latest News